पद्मावती मंदिर | राजगड | धार्मिक भटकंती | Padmavati temple | Rajgad Fort | Religious Bhatkanti | Vinod Kamble

"पद्मावती मंदिर - राजगड"
धार्मिक भटकंती सिरीज - किल्ले भटकंती आणि तेथील ग्रामदैवता

अभेद्य बालेकिल्ला, वैशिष्ट्यपूर्ण तटबंदीचे बांधकाम, नेढे (Nedhe - a naturally formed hole in a rock) सारखं निसर्गशिल्प, तीन दिशांना पसरलेल्या विस्तीर्ण माची आणि बरंच काही. 

"गडांचा राजा आणि राजांचा गड", किल्ले राजगड. 

गुंजवणे (Gunjvane) आणि पाली (Pali) ह्या दोन गावातून जास्त प्रमाणात पर्यटक किल्ल्यावर येतात. गुंजवणे गावातून चोर दरवाजा (Chor Darwaja) किंवा गुंजवणे दरवाजा (Gunjavane Darwaja) ह्यापैकी एक मार्ग आपण निवडू शकता. चोर दरवाजा मार्गे आपण गडावर थेट पद्मावती माचीवर (Padmavati Machi) पोहोचतो. माचीवर पद्मावती मातेचे मंदिर (Goddess Padmavati temple) आहे. पद्मावती माचीचे नाव पद्मावती देवीच्या मंदिरावरून ठेवले आहे आणि त्याच नावाचे लहान तळे देखील जवळच आहे. शिवरायांनी मुरुंबदेव किल्ल्याचे राजगड असे नामकरण केल्यावर पद्मावती मंदिराची स्थापना केली होती असे सांगण्यात येते. पिण्यायोग्य पाण्याच स्वच्छ टाकं देखील मंदिराला लागून आहे. त्याव्यतिरिक्त माचीवर रामेश्वर मंदिर (Rameshwar temple), सदर, राजवाडा व कचेरीचे अवशेष, दारुखाना, अंबरखाना व महाराणी सईबाई यांची समाधी (Maharani Saibai Samadhi) देखील आहे. 

ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी धार्मिक भटकंती येथे क्लिक करा.

#DharmikBhatkanti #padmavati #temple #rajgad #gunjvane #pune 
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu