कोराई माता मंदिर | कोरीगड किल्ला | धार्मिक भटकंती | Korai Mata Temple | Korigad Fort | Religious Bhatkanti | Vinod Kamble

"कोराई माता मंदिर - कोरीगड किल्ला"
धार्मिक भटकंती सिरीज - किल्ले भटकंती आणि तेथील ग्रामदैवता

लोणावळापासून २० किमी अंतरावर कोरीगड किल्ला (Korigad Fort) आहे. कोरीगडाला कोराईगड (Koraigad Fort) ह्या नावाने देखील जाते. हे नाव पडले ते किल्ल्यावरील कोराई मातेच्या मंदिरामुळे (Goddess Korai temple). मंदिर परिसरात दीपमाळ आहे. लख्ख अंधारात एका छोट्या दिव्याच्या प्रकाशात मातेची मूर्ती खूप तेजस्वी दिसते. 

गडाचा माथा सपाट व दक्षिणोत्तर पसरलेला आहे. कोराई मातेच्या मंदिरा व्यतिरिक्त गडावर दोन महादेव मंदिरे, दोन तळे, उत्तर व दक्षिण दिशेला भव्य बुरुज, कोठार, गुहा, तोफा, वाड्याचे अवशेष आहेत. किल्ल्यावरून आंबी व्हॅली सिटी (Aamby valley city) व आजूबाजूंच्या सह्य शिखरांचा, किल्ल्यांचा नजारा पाहायला मिळतो. पायथ्याच्या पेठ शहापूर (Peth Shahapur) गावातून मार्ग गडाकडे येतो. यामुळे कोरीगडाला शहागड (Shahagad) हे देखील नाव पडले आहे. त्या व्यतिरिक्त आंबवणे (Aambavane) गावातून देखील गडावर येण्यासाठी मार्ग आहे. 

ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी धार्मिक भटकंती येथे क्लिक करा.

#DharmikBhatkanti #korigad #korai #mulshi #pune
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu