किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
किल्ल्याची उंची : ~2850 फूट
ठिकाण : जुन्नर तालुका, पुणे
पायथ्याचे गाव : गडाची वाडी (खोडद)
वेळ (पायथा ते किल्ला) : 30 मिनिटे
ट्रेक श्रेणी : सोपी
सहनशक्ती पातळी : कमी
जवळील रेल्वे स्टेशन : पुणे
दिनांक : 25 फेब्रुवारी 2024
खराडी, पुणे ते नारायणगड प्रवास (How to reach Narayangad Fort of Junnar)
जय शिवराय, आजची आपली भटकंती असणार आहे, जुन्नर मधील नारायण गडाची. मी पुणे-खराडी येथून निघालो होतो. जवळपास 90 किलोमीटरचे अंतर. मी एकटाच निघालो होतो. शिक्रापूर, मलठण मार्गे मी थेट गडाच्या पायथी, म्हणजेच गडाचीवाडी खोडद येथे पोहोचलो. नारायणगाव बस स्टॅन्डपासून किल्ला फक्त 11 किमी अंतरावर. गाडी थेट पायथी असलेल्या मुकाई देवी मंदिराकडे (Mukai Devi Temple) जाते व जवळच पार्किंग साठी जागा देखील आहे.
 |
| मुकाई देवी मंदिर |
मुकाई देवीचं दर्शन घेतलं, बाईक पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात.
किल्ले भटकंती
गडापर्यंतची संपूर्ण वाट पायऱ्यांची, त्यातही अर्धा पेक्षा जास्त मार्ग अलीकडे बनवलेल्या पायऱ्यांचा, तर शेवटच्या टप्प्यात कातळ कोरीव पायऱ्या देखील. गडावर पोहोचण्याआधी एक वाट उजव्या बाजूला जाताना दिसली. कोणीतरी सोबत असावी म्हणून थोडा थांबलो आणि नेमकं त्याच वेळी एक ट्रेकर मित्र, प्रफुल्ल, जो किल्ला पाहून आला होता, तो देखील त्याच मार्गाने जाण्याच्या इच्छित होता.
 |
| देवदत्त गुहा |
आम्ही दोघेही त्या उजव्या बाजूच्या वाटेने थोडं सांभाळूनच गेलो, कारण वाट थोडी अवघड होती. तेथे देवदत्त गुहा (Devdatt Cave) आहेत. गुहा पाहून पुन्हा कातळ कोरीव पायऱ्यांच्या मार्गावर आलो. थोडे अनुभव एकमेकाशी शेअर केले, गप्पा झाल्या आणि तो ट्रॅकर मित्र मग खाली निघाला. मी काही पायऱ्या अजून चालून गडावर पोहोचलो. गडाचा विस्तार पूर्व-पश्चिम आहे. मी अगोदर पूर्व बाजूस निघालो. वाटेत काही पाण्याच्या टाक्या व एक टाक्यांचा समूह दिसला.
 |
| पाण्याच्या टाक्या |
जवळच समाधी शिल्प देखील आहे. पूर्व बाजू कडील उंच भागाकडे निघालो. अगदीच टोकाला एक भगवा लावण्यात आला आहे.
 |
| समाधी शिल्प |
पुन्हा किल्ल्याच्या मध्यभागी आलो. आता पश्चिम बाजूकडे निघालो. येथे देखील काही पाण्याच्या टाक्या व जाताना काही ऐतिहासिक व बांधकामाचे अवशेष पाहायला मिळाले.
 |
| पाण्याच्या टाक्या |
 |
| ऐतिहासिक व बांधकामाचे अवशेष |
ते पाहून गडाच्या सर्वोच्च ठिकाणी वसलेल्या हस्तमाता देवीच्या (Hastmata Temple) मंदिराकडे निघालो. पूर्ण किल्ल्यावर सावली असलेले हे एकमेव ठिकाण मला मिळाले. देवीचे दर्शन घेतलं आणि काही वेळ तिथेच बसून राहिलो.
 |
| हस्तमाता मंदिर |
आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दृश्य पाहून परतीच्या मार्गाला लागलो. दहा ते पंधरा मिनिटात पुन्हा पायथा गाठला.
ह्या भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी
नारायणगड येथे क्लिक करा.
पुणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी
पुणे येथे क्लिक करा.
जय शिवराय
0 Comments